Katrina Kaif- कतरिना कैफ का गेली पाकिस्तानला? वाचा सविस्तर

अभिनेत्री कतरिना कैफ ही तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेच राहिली आहे. सध्या कतरिनाचा कोणताही चित्रपटाची अजून घोषणा नसल्यामुळे, कतरिना इव्हेंटस् मध्ये आपल्याला दिसू लागली आहे. नुकतेच कतरिना पाकिस्तानमध्ये गेल्याची चर्चा सोशल माध्यमांवर सुरु होती. कतरिनाने नुकतेच सासूसोबत प्रयागराजला जाऊन गंगास्नानही केले होते. त्यानंतर मात्र कतरिना फारशी कुठेही दिसली नाही.

नुकताच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोवरूनच कतरिना ही पाकिस्तानात गेल्याचे समजते. कतरिना तिथून जाऊन आल्यानंतर, ती नेमकी पाकिस्तानमध्ये का आणि कोणत्या कामासाठी गेली होती यावर चर्चा रंगू लागली. पाकिस्तानमधील तिच्या सोबत फोटोमध्ये कोण व्यक्ती आहे अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर घडू लागल्या.

कतरिना पाकिस्तानमध्ये एका फॅशन डिझाइनरच्या इव्हेंटसाठी गेलेली होती. यासंदर्भात पाकिस्तान मधील फॅशन डिझायनर हसन शहरयार यासीन एक व्हिडीओ टाकलेला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच कतरिनाच्या पाकिस्तान भेटीचा खुलासा झालेला आहे. सध्याचा हा व्हायरल व्हिडीओ साधारण दिड वर्षांपूर्वीचा असल्याचेही समजते.

katrina-kaif-in-bharat-new

कतरिना हे नाव अनेकांसोबत चर्चेला होते. यामध्ये सलमान खान, रणबीर कपूर या दोन नावांची प्रामुख्याने चर्चा होती. परंतु विक्की कौशलसोबत लग्न करून कतरिनाने सर्वांनाच धक्का दिला होता. सध्याच्या घडीला कतरिना आगामी कोणत्याही शूटिंगमध्ये व्यस्त नसल्याने, ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह दिसते.