अफेअरबद्दल कळलं, पत्नीने आईच्या मदतीने रचला कट आणि नवऱ्याला संपवलं

उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात एका विवाहित तरुणीने तिच्या प्रियकरासोबत मिळून पतीची अत्यंत भयंकर पद्धतीने हत्या केली होती. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. ही घटना ताजी असताना कर्नाटकातील बंगळुरूमध्ये पत्नीने आपल्या आईच्याच मदतीने स्वत:च्या नवऱ्याची हत्या केली. या घटनेमुळे बंगळुरूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नी आणि आईला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकनाथ सिंह असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते इस्टेट एजेंट होते. यशस्विनी (19) असे लोकनाथच्या बायकोचे नाव असून हेमा भाई (37) असे त्याच्या सासूचे नाव आहे. यशस्विनीने काही महिन्यांपूर्वीच आई वडिलांच्या विरोधात जाऊन लोकनाथ सोबत लग्न केलं होतं. लग्नानंतर यशस्विनी जेव्हा सासरी आली तेव्हा तिला आपल्या नवऱ्याच्या एक्स्ट्रा मेरिटल अफेरबद्दल समजलं होतं. त्यामुळे ती खचून गेली होती. या गोष्टीवरून नवरा बायकोमध्ये नेहमी भांडणे होत होती.

यशस्विनीने तिच्या नवऱ्याला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता. मात्र लोकनाथ यशस्विनीकडे वारंवार दुर्लक्ष करायचा. याच गोष्टीला कंटाळून यशस्विनी माहेरी निघून गेली. यानंतर लोकनाथ यशस्विनीला घरी परत येण्यासाठी दबाव टाकू लागला. जर तू घरी परत आली नाहीस तर तुझ्या आईला घरी घेऊन जाईन अशी धमकी त्याने दिली. या जाचाला कंटाळून यशस्विनी आणि तिच्या आईने मिळून लोकनाथच्या हत्येचा कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 मार्च रोजी यशस्विनी लोकनाथला भेटण्यास बोलावलं. यानंतर दोघेही सोलादेवनहल्लीला निघून गेले. यावेळी यशस्विनीच्या आईने देखील त्या दोघांचा पाठलाग करत तेथे पोहोचली. यानंतर यशस्विने संधीचा फायदा घेऊन त्याला दारू पाजली आणि जेवणात गुंगीच्या गोळ्या टाकून दिल्या. यामुळे लोकनाथ बेशुद्ध झाला. हे पाहून यशस्विनीच्या आईने लोकनाथच्या गळ्यावर चाकूने सपासप दोन तीन वार केले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी दोघींनाही ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.