Sikandar- ‘म्हातारा’ म्हटलं म्हणून सलमान भडकला; ‘दबंग खान’ने सुनावले ट्रोलर्सना खडे बोल!

सध्याच्या घडीला आपला दबंग खान त्याच्या आगामी ‘सिकंदर’ चित्रपटामुळे बराच चर्चेत आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलरला चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात पसंतीही मिळाली होती.ट्रेलरनंतर आता भाईजानला मोठ्या पडद्यावर कधी पाहतो असं सर्व चाहत्यांना वाटत आहे. या चित्रपटामध्ये सलमान सोबत रश्मिका मंदाना असून, सलमानने नुकतंच या दोघांच्या वयातील अंतरावर एक भाष्य केलेलं आहे.

सध्याच्या घडीला सलमान खान 59  वर्षांचा आहे आणि रश्मिका 28 वर्षांची आहे. त्यांच्या वयात 31 वर्षांचा फरक असून, सध्याच्या घडीला यावर सोशल मीडियावर चर्चा घडू लागली आहे. म्हणूनच सलमानने ट्रोलरला चांगलेच सणसणीत त्याच्या स्टाइलमध्ये उत्तर दिलेलं आहे.

ट्रोलर्सना काय म्हणाला सलमान खान?
रश्मिका आणि माझ्यात ३१ वर्षांचा फरक आहे. परंतु तिला काहीच अडचण नाही, तिच्या वडिलांना अडचण नाही.. तर तुम्हाला का अडचण आहे भाऊ? असे सलमानने विधान केले. यावर अधिक बोलताना तो म्हणाला, रश्मिकाच्या लग्नानानंतर तिच्या मुलीसोबतही मी काम करेन. यावेळी व्यासपीठावरील रश्मिकाला सलमानच्या या वक्तव्यावर मनसोक्त हसू येताना दिसले.

सलमान खान हा कायमच त्याच्याबाबत घडणाऱ्या गोष्टींवर भाष्य करण्यासाठी प्रसिद्ध आहे. परंतु त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक घटनांवर मात्र त्याने भाष्य करण्याचे अनेकदा टाळले आहे. सिंकदर चित्रपटाची घोषणा झाल्यापासून, सलमान हा त्याच्या वयामुळे ट्रोल होताना दिसत होता. सोशल माध्यमावर सध्याच्या घडीला सलमानच्या वयाबद्दल अनेक मीम्स आणि प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत.

‘सिकंदर’ या चित्रपटामध्ये सलमान खान आणि रश्मिका मंदाना व्यतिरिक्त काजल अग्रवाल, सत्यराज आणि शर्मन जोशी देखील दिसणार आहेत. एआर मुरुगदास दिग्दर्शित हा चित्रपट ईदच्या निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.