
सुवर्णसूर्य फाऊंडेशन आयोजित कोकणातील पहिल्या गणपतीपुळे अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 56 किमीच्या मॅरेथॉनमध्ये कृष्णात सोनमले, निलिमा भडगावकर, रजनी सिंग, अमोल यादव यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. तर 35 किमीच्या मॅरेथॉनमध्ये प्रतिभा सिंग, जॉर्ज थॉमस, माणिक वाघ, आणि अकुलती निलेकर यांनी आपल्या गटात अव्वल स्थान पटकावून स्पर्धा गाजवली.
गणपतीपुळे ते बसणी या मार्गावर रविवारी रात्री 12 ते सकाळी 8 या वेळेत झालेल्या हा स्पर्धेचा थरार रंगला. 35 किमी आणि 56 किमीच्या या दोन स्पर्धांमध्ये 250 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेऊन स्पर्धा यशस्वी केली. गणपतीपुळे ते बसणी व परत या मार्गावर या स्पर्धेला सर्व ग्रामपंचायत, ग्रामस्थांनी उदंड प्रतिसाद दिला.
स्पर्धेचा गटनिहाय निकाल
56 किमी
41 वर्षांवरील पुरुष – कृष्णात सोनमले, सिद्धेश भिडे, अजित गोडभारले, पांडुरंग बोडके, विश्वनाथ क्षिरसागर.
41 वर्षांवरील महिला – निलिमा भडगावकर, वरुणा राव, चैताली लांबट.
40 वर्षांपर्यंत महिला – रजनी सिंग, अनुभा अगरवाल, गीता परब.
40 वर्षांपर्यंत पुरुष – अमोल यादव, अमित बाठे, मनिष यादव.
35 किमी
41 वर्षावरील महिला- प्रतिभा सिंग, नेहा सिंग, अमृता सिंग.
41 वर्षांवरील पुरुष- जॉर्ज थॉमस, सूर्यकांत पारधी, स्वप्नील माने.
40 वर्षांपर्यंत पुरुष- माणिक वाघ, आश्वनी पांडे, रवि पुरोहित.
40 वर्षांपर्यंत महिला- अकुलती निलेकर, तनुश्री मालविय, जिगिप्सा गमित.