
कर्नाटकच्या अनेकल येथे मंदिर मिरवणुकीदरम्यान 100 फूट रथ कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत. अचानक आलेल्या जोरदार वाऱ्यामुळे आणि मुसळधार पावसामुळे रथ कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
हुस्कुर मद्दुरम्मा देवी जत्रा महोत्सवादरम्यान शनिवारी एका मंदिराजवळ हा रथ कोसळला. रोहित (26) आणि ज्योती (14) अशी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. जखमींपैकी एक पुरूष आणि एक महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.