Ratnagiri News – कोकणाच्या शिरपेचात मानाचा तुरा, नाबेटचे मानांकन मिळणारी माने इंटरनॅशनल स्कूल पहिली शाळा

क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडियाने प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेच्या माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरीला नॅशनल अ‍ॅक्रेडेशन बोर्ड फॉर एज्युकेशन अँड ट्रेनिंगचे (एनएबीईटी) मानांकन जाहिर केले आहे. देशातील फक्त 67 शाळांना हे नाबेटचे मानांकन प्राप्त झाले आहे. कोकणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून हे मानांकन पटकविणारी माने इंटरनॅशनल स्कूल ही एकमेव शाळा आहे.

माने इंटरनॅशनल स्कूल नाबेटचे मानांकन मिळविणारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूरमधील पहिलीच शाळा असल्याचे माने इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक प्रद्युम्न माने यांनी सांगितले. महाराष्ट्रातील फक्त 20 शाळांना हे नाबेटचे मानांकन मिळाले आहे. हे यश सर्व शिक्षक, कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, हितचिंतक पालक आणि विद्यार्थी यांचे असल्यानेच प्रद्युम्न माने यांनी सांगितले.