
मिंधे-भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या सौंदर्यीकरण उपक्रमात पालिकेने जे. जे. उड्डाणपुलाखाली जुन्या बेस्ट गाडय़ांना नवे रूप देत सुरू केलेली आर्ट गॅलरी, वाचनालय आणि पॅफेटेरिया सद्यस्थितीत अक्षरशः धूळ खात पडले असून त्याची दुरवस्था झाली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या डबलडेकर आणि सिंगल डेकर तीन बस या ठिकाणी उभ्या असून त्यांच्यावर प्रचंड धूळ साचली आहे .या ठिकाणच्या मध्यवर्ती दुभाजकावरील हिरवळ सुकत चालली आहे, संरक्षक रॉडवर गंज चढला आहे. शिवाय या ठिकाणी कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे नशेबाज या ठिकाणी ठिय्या मांडत आहेत. तसेच या ठिकाणी अस्वच्छताही पसरली आहे. त्यामुळे पर्यटकांकडून पालिकेच्या हलगर्जीपणाबद्दल संताप व्यक्त होत आहेत. या ठिकाणाचा गैरफायदा घेतला जाण्याची भीतीदेखील आहे.