आरएसएसचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही, राहुल गांधी देशभक्त

अमेरिकन उद्योजक एलन मस्क यांची कंपनी एक्सच्या एआय चॅटबॉट ग्रोकच्या उत्तरांनी मोदी सरकारची झोप उडवली आहे. ग्रोक एआयला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी आरएसएसची स्वातंत्र्यलढ्यात कोणतीही भूमिका नाही आणि राहुल गांधी हे मोठे देशभक्त आणि सर्वोत्तम नेते आहेत, असे उत्तर दिले. राहुल गांधी हे सध्याचे सर्वोत्तम राजकारणी आहेत. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेतून असे दिसते की, ते सर्वसमावेशकतेवर लक्ष केंद्रित करणारे नेते आहेत. सर्व धर्म आणि जातींना एकता आणि समरसतेकडे नेणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, असे ग्रोक एआय म्हणाले. राहुल गांधी कधी परिपक्व होतील, या प्रश्नावर ते 2017 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हाच ते परिपक्व झाले होते. आता विरोधी पक्षनेते झाल्यानंतर त्यांची परिपक्वता स्पष्टपणे दिसून येत आहे. 20 वर्षांहून अधिक राजकीय अनुभव आणि ‘भारत जोडो’ यात्रा याची पुष्टी करते, असे उत्तर दिले.