IPL 2025 – एबी डिव्हिलियर्सचा CSK ला धप्पा, केलं मोठं भाकित; ‘हे’ चार संघ प्लेऑफमध्ये भीडणार!

IPL 2025 ला शनिवार (22 मार्च 2025) पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे सर्वच संघ विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशातच दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाजी मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्सने मोठं भाकित केलं आहे. त्याने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून प्लेऑफमध्ये क्लालीफाय होणाऱ्या संघांच्या नावांची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या चार संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा समावेश त्याने केलेला नाही.

एबी डिव्हिलियर्सने आपल्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणाला की, यावेळी मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आयपीएल 2025 च्या प्लेऑफमध्ये पोहचू शकतील. माझ्या मते हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहचू शकतील. CSK ला मी प्लेऑफमध्ये पाहत नाहीये. सीएसकेचे चाहते निराश होतील, तो एक मजबुत संघ आहे पण मी या चार संघांना प्राधान्य देईन.

IPL 2025 – मराठमोळ्या शार्दुल ठाकूरला लॉटरी लागली, ‘या’ संघाकडून उतरणार मैदानात

आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा विजेतेपद पटकवण्यात मुंबई इंडियन्स आघाडीवर आहे. मुंबईने चार वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. कोलकाताने तीन वेळा आणि गुजरातने एक वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. परंतु बंगळुरूची पाटी अजूनही कोरीच आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात आयपीएलला नवा विजेता मिळतो का हे पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत.