सोमनाथ सूर्यवंशीचा जीव पोलिसांनी घेतला, आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत झालेला मृत्यू हा नैसर्गिक नसून पोलिसांच्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. हे आता स्पष्ट झालं आहे. यामध्ये सरकार आता उघडलं पडलं आहे. ज्या पोलिसांमुळे ही घटना घडली, त्या आरोप पोलिसांवर 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली आहे.

विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत की, “याप्रकरणी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांचं निलंबन झालं पाहिजे.” दरम्यान, परभणीत झालेल्या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा कारागृहातच मृत्यू झाला होता, अशी माहिती न्यायदंडाधिकाऱ्यांचा अहवाल समोर आली आहे. यानंतर आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी आणि राज्यातील विरोधी पक्षांनी आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही मागणी केली आहे.