
भाजप नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले होते त्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने खंडणीसाठी पैसे मागितले होते आणि हे पैसे घेताना अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.
मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला आपले नग्न फोटो पाठवले होते. यावरून मोठा गदारोळ झाला होता. या प्रकरणी गोरे यांनी महिलेची माफी मागितली होती, तसेच पुन्हा त्रास देणार नाही, असे म्हटले होते. आता या पीडित महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. या महिलेने गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी एक कोटी रुपये घेताना या महिलेला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.