11 कोटीचे कोकेन जप्त

कोकेनची तस्करी करणाऱया ब्राझीलच्या नागरिकाला महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने अटक केली. त्याने कपड्यामध्ये द्रव्य स्वरूपात ते कोकेन आणले होते. कोकेन तस्करीप्रकरणी त्याला डीआरआय मुंबई युनिटने अटक केली. ब्राझील देशातून एक प्रवासी कोकेन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. त्यानंतर डीआरआयने विमानतळावर सापळा रचून त्या प्रवाशाला ताब्यात घेतले. त्याच्याकडील साहित्याची झडती जप्त केलेल्या कोकेनची किंमत सुमारे 11.1 कोटी रुपये आहे.