इस्रायलचे गाझात रात्रभर हल्ले; 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू

इस्रायलने गाझामध्ये बुधवारी पुन्हा रात्रभर हवाई हल्ले केले. या हल्ल्यात तब्बल 85 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून यात मोठय़ा संख्येने महिला आणि मुलांचा समावेश आहे. आज सकाळीही हल्ले सुरूच होते. मंगळवारी इस्रायलने युद्धविराम कराराचे उल्लंघन करत गाझापट्टीत हल्ल्यांना सुरुवात केली. तेव्हापासून तब्बल 592 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे.