माथाडी कामगार विधेयक विधान परिषदेत संमत

बनावट माथाडी मंडळांच्या मनमानी कारभाराला लगाम घालणारे तसेच महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार कायद्यात महत्त्वाच्या सुधारणा करणारे महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार अधिनियम सुधारणा विधेयक विधान परिषदेत संमत करण्यात आले. दरम्यान, हे विधेयक नंतर विधानसभेत मांडले जाणार आहे.