
बुलढाणा जिह्यातील शेगाव तालुक्यात अचानक केसगळतीचे प्रकार हे रेशनच्या गव्हामुळे झालेले नाहीत तसेच पाण्यामुळेही झालेले नाहीत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली. अल्पकालीन चर्चेदरम्यान सदस्य सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला बोर्डीकर यांनी उत्तर दिले. दरम्यान, आयसीएमआरचा अहवाल मिळाल्यानंतर याचे खरे कारण समोर येईल, अशी माहिती त्यांनी दिली.