
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव आणि इंदापूर येथील बाह्यवळण रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे मोठी वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या कामाला सरकारने तातडीने गती द्यावी, अशी विशेष उल्लेख सूचना शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी मांडली.
कोकणातून शिमगोत्सव साजरा करून येणाऱ्या हजारो चाकरमान्यांना इंदापूर ते मानखुर्ददरम्यान वाहतूककोंडीच्या विघ्नाचा सामना करावा लागला होता. या ठिकाणी दोन्ही बाजूला सुमारे 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे या ठिकाणच्या वाहतूककोंडीसाठी सरकारने ठोस उपाययोजना हाती घ्यावी, अशी मागणी सुनील शिंदे यांनी सरकारकडे केली आहे.