जेएनपीटीला जोडणाऱ्या सहापदरी रस्त्याला केंद्राची मंजुरी

जेएनपीटीला जोडणाऱ्या सहापदरी रस्त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या मार्गाची एकूण लांबी 29.219 किलोमीटर इतकी असणार आहे. या प्रकल्पाच्या 4 हजार 500 कोटींच्या खर्चाला केंद्र सरकारने मंजुरी दिली. या महामार्गामुळे मुंबई-पुणे तसेच गोवा महामार्गावरील प्रवाशांची वाहतूककोडीतून सुटका होणार आहे. सध्या जेएनपीटीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड वाहतुकीमुळे 2 ते 3 तास लागतात. जेएनपीटीला जोडल्या जाणाऱ्या या महामार्गाची सुरुवात पागोटे या गावापासून होणार आहे.