
‘आरसीएफ’ कर्मचारी सेना मान्यताप्राप्त युनियन व स्थानीय लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. ‘आरसीएफ’ परिवार सदैव ‘मातोश्री’ आणि शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहणार असल्याची ग्वाही यावेळी युनियनकडून उद्धव ठाकरे यांना देण्यात आली.
यावेळी ‘आरसीएफ’ कर्मचारी सेना मान्यताप्राप्त युनियनचे अध्यक्ष शिवसेना नेते, माजी खासदार विनायक राऊत, कार्याध्यक्ष विलास पोतनीस, विभागप्रमुख प्रमोद शिंदे, ‘आरसीएफ’ कर्मचारी सेनेचे सरचिटणीस दत्तात्रय परब, ‘आरसीएफ’ स्थानीय लोकाधिकार समितीचे सरचिटणीस आल्हाद महाजन, जे. पी. सिंग, युनिट सेक्रेटरी नीलेश गांवकर, वैभव घरत, मिलिंद कुलकर्णी, रवींद्र भालेकर, जीवन भोईर, सुयोग हाडवळे, विवेक कांडारकर, हनुमंत मोती, मंदार भोपी, प्रशांत म्हात्रे, निकित चव्हाण, सिद्धेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.