पॅथॉलॉजी लॅबसाठी स्वतंत्र कायदा, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती

राज्यात रोगनिदान तपासण्यांसाठी अर्थात पॅथॉलॉजी लॅबसाठी लवकर स्वतंत्र कायदा आणण्यात येणार असून त्याची अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. त्यामुळे कोणी अवैध पद्धतीने तपासण्या करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करणे आता शक्य होणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. विधान परिषदेत अर्ध्या तासाच्या चर्चेदरम्यान सदस्य सुनील शिंदे यांनी राज्यातील रोगनिदान तपासणीचे दर आणि प्रयोगशाळांतील सुविधांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते.