
प्रशांत पाटीलचा अष्टपैलू खेळ, हर्षवर्धन पांडेयच्या शतकी खेळीमुळे युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने टाइम्स ऑफ इंडियाचा 195 धावांनी पराभव करत 49 व्या ठाणे वैभव आंतरकार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या बी गटात आगेकूच केले. सलामीच्या फलंदाजांच्या योगदानामुळे 285 धावसंख्या उभारल्यावर गोलंदाजांनी आपली जबाबदारी चोख बजावत प्रतिस्पर्ध्यांना 90 धावांत गुंडाळून युनायटेड पटनी इंडस्ट्रीज संघाने आगेकूच केली.