
तुम्हाला क्रिकेटच्या मैदानावर, अकादमीत आणण्यासाठी, तुम्हाला क्रिकेटपटू होताना पाहताना किंवा क्रिकेटच्या मैदानातून पुन्हा घरी घेऊन जाताना तुमच्या पालकांना किती मेहनत घ्यावी लागते, त्रास सहन करावा लागतो हे तुम्हाला विसरून चालणार नाही. कारण जवळपास नेहमीच त्यांना हा त्रास सहन करावा लागतो. त्याचबरोबर तुमचे प्रशिक्षकदेखील तुम्हाला छोट्या वयापासून प्रशिक्षण देताना आणि तुमचे मार्गदर्शक म्हणून तुम्ही उच्च दर्जावर पोहोचण्यासाठी कठोर मेहनत घेत असतात. त्यामुळे आपल्या पालकांचा आणि प्रशिक्षकांचा नेहमीच आदर करा, असा कानमंत्र दिलाय हिंदुस्थानी संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी दिला.