
मुंबई, दिल्ली, सुरत, मेरठ, फरीदाबाद, बंगळुरू, ग्वाल्हेर, कोटा आणि लुधियाना ही नऊ शहरे उष्णतेच्या लाटेत होरपळण्याची शक्यता आहे. कारण या शहरांमध्ये अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकारांकडून दीर्घकालीन उपाययोजनाच करण्यात आल्या नसल्याची धक्कादायक बाब नवी दिल्लीतील ‘सस्टेनेबल फ्युचर्स कोलॅबरेटीव्ह’ या संशोधन संस्थेच्या अहवालातून उघड झाली आहे. दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन आराखडय़ात उष्णतेची लाट या नव्या संकटाचा समावेश करावा, अशी सूचना संसदीय स्थायी समितीने केंद्र सरकारला केली आहे.