
>> योगेश जोशी, [email protected]
आजचे पंचाग
तिथी – फाल्गुन कृष्ण अष्टमी
वार -शनिवार
नक्षत्र – मूळ
योग – व्यतीपात
करण – बालव
राशी – धनु
मेष
मेष राशीसाठी आजचा दिवस नशिबाची चांगली साथ मिळणार आहे. त्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. चंद्र भाग्य स्थानात असल्याने नशिबाची चांगली साथ मिळणार असल्याने अनपेक्षित लाभाच्या घटना घडणार आहेत. मात्र, व्यय स्थानातील राहुमळे विनाकारण दडपण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नैराश्यावर मात करत मिळणाऱ्या संधीचा फायदा करून घेण्याची गरज आहे. नशिबाची साथ असल्याने आर्थिक लाभाचेही योग आहेत.
वृषभ
वृषभ राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. चंद्राचे भ्रमण अष्टम स्थानात होणार असल्याने धावपळ, दगदग टाळण्याची गरज आहे. तसेच प्रवासात वस्तूंची योग्य ती काळजी घ्यावी. पथ्यपाण्याकडे दुर्लक्ष करू नये, अन्यथा आजार बळावण्याची शक्यता आहे. लांबचे प्रवास शक्यतो टाळावे. मात्र, आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या चांगला जाणार आहे.
मिथुन
मिथुन राशीला आजचा दिवस कामाचे नवे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय भागीदारीत चांगले दिवस असल्याने त्याचा फायदा घेण्याची गरज आहे. चंद्र सप्तम स्थानात असल्याने व्यवसायात आणि कार्यक्षेत्रातील वातावरण तुमच्यासाठी अनूकूल होणार आहे. कामातील अडचणी कमी होण्याची शक्यता आहे. कार्यस्थळी मनासारखी कामे होणार आहेत. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळणार असल्याने घरातील वातावरण प्रसन्न राहणार आहे.
कर्क
कर्क राशीच्या लोकांना आजचा दिवस सावधपणे घालवावा लागणार आहे. तसेच विनाकारण धावपळ दगदग टाळण्याची गरज आहे. चंद्र षष्ठ स्थानात असल्याने घरात कुरबुरी होण्याची शक्यता आहे. तसेच काहीजण विनाकारण वाद उकरून काढण्याचा प्रयत्न करतील. त्याकडे दुर्लक्ष करत शांत राहण्याचा प्रयत्न केल्यास ताणतणाव वाढाणार नाही. महत्त्वाची कामे रखडू नये, यासाठी हितशत्रूंवर लक्ष ठेवण्याची गरज आहे.
सिंह
सिंह राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ ठरणार आहे. चंद्र पंचम स्थानात असल्याने नातलगांकडून किंवा मुलांकडून शुभ समाचार मिळणार आहेत. परीक्षांचा काळ असल्याने मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे लागणार आहे. कार्यक्षेत्रात केलेल्या चांगल्या कामाचे आता फळ मिळणार आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे शुभ परिणाम मिळणार आहे. गुरुच्या पाठबळामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागण्याची शक्यता आहे.
कन्या
कन्या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सुखसमाधानाचा आहे. आज घरातील वातवरण प्रसन्न राहणार असल्याचा दिवस आनंदात जाणार आहे. चंद्र चतुर्थ स्थानात असल्याने घराकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यात नशिबाची साथही मिळणार आहे. चंद्राच्या भ्रमणामुळे लाभदायक घटना घडण्याचे योग आहेत.
तूळ
तूळ राशीच्या लोकांना आजचा दिवस प्रतिष्ठा वाढवणारा ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात आणि कार्यक्षेत्रात आता मनासारख्या गोष्टी घडण्यास सुरुवात होत आहे. उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र, अतिआत्मश्वाने कामे रखडणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. चंद्र तृतीय स्थानात असल्याने प्रसिद्धीचे योग आहेत. सामाजिक क्षेत्रात फायद्याचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजचा दिवस लाभाचा ठरण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. आधीच्या गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचे योग आहे. बरेच दिवस अडकलेले पैसे परत मिळण्याचे योग आहेत. तसेच कार्यक्षेत्रातही महत्त्वाच्या ठिकाणी बढती किंवा बदली मिळण्याचे योग आहेत. त्यामुळे जुनी उधार उसनवारी वसूल होणार आहे. तसेच संकटातून मार्ग सापडण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यात यश मिळणार आहे.
धनु
धनु राशीच्या लोकांना आजचा दिवस आत्मविश्वास आणि उत्साह वाढवणारा ठरणार आहे. गरजेच्या कामासाठी खर्च होणार असल्याने त्यावर फारसा विचार करणे टाळा. तसेच अनावश्यक खर्चावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. चंद्र प्रथम स्थानात येत असल्याने त्याचा कार्यक्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात फायदा होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामात तुमचा उत्साह दिसणार आहे. मनासारखी कामे होत असल्याने दिवसाचा आनंद घेता येणार आहे.
मकर
मकर राशीच्या लोकांना आजचा दिवस खर्चाचा ठरणार आहे. चंद्राचे व्यय स्थानात भ्रमण होत असल्याने अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच अचानक खर्चही समोर उभे ठाकू शकता. त्यामुळे तुमचे महिन्याचे आर्थिक गणीत बिघडण्याची शक्यता आहे. व्यय स्थानात चंद्र आल्याने अस्वस्थता, नैराश्य वाढण्याची शक्यता आहे. त्यावर मात करत मनोरंजनासाठी किंवा लहान सहलीचा बेत आखू शकता.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या फायद्याचा ठरणार आहे. आज अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत. आधी केलेल्या कामेच आता चांगले फळ मिळणार आहे. तसेच केलेल्या कामाचे कार्यक्षेत्रात कौतुक होणार आहे. त्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढणार आहे. चंद्र आय स्थानात असल्याने मित्रमैत्रिणी भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे मन प्रसन्न होणार आहेय अनुकूलता वाढवणारा दिवस असल्याने आजचा दिवस फायद्याचा ठरणार आहे.
मीन
मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस कामाचे नियोजन करावे लागणार आहे. अचानक समोर उभ्या ठाकलेल्या कामांमुळे ताण वाढण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी गोड बोलत त्यांच्या कलाने घेतल्या त्यांचे सहकार्य मिळणार आहे. तसेच संयम ठेवल्यास नशिबाची चांगली साथ मिळण्याची शक्यता आहे. विनाकारण चिडचीड केल्यास होणारी कामे रखडण्याची शक्यता आहे. कार्यक्षेत्रातील आणि व्यवसायातील संकटांवर मार्ग सापडणार असल्याने तुमचा उत्साह वाढणार आहे.