
मराठी का आलं पाहिजे? मराठी येणं गरजेंच नाही, असा उद्दामपणा दाखवत एका परप्रांतीय महिलेने मराठी भाषेचा अपमान केल्याची संतापजनक घटना कांदिवलीतील चारकोपच्या एअरटेल गॅलरित घडली होती. त्यानंतर शिवसेनेने एअरटेल प्रशासनाला चांगलाच धडा शिकवला होता. शिवसेनेच्या दणक्यामुळे एअरटेलने आता मराठीतून हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे.
हिंदी भाषेचा आग्रह करत एअरटेलच्या मुजोर परप्रांतीय महिलेने मरीठीतून बोलण्यास नकार दिला होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर शिवसेनेच्या अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाला धारेवर धरत एअरलेट प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांना मराठी भाषेचं महत्त्व समजून सांगावे, मराठी भाषेत हेल्पलाईन सुरू करावी अन्यथा गॅलरी सुरू ठेवू देणार नाही, असा इशारा देण्यात आला होता. शिवसेनेने दिलेल्या दणक्यामुळे एअरटेल प्रशासनाने मराठीतून हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. तसे पत्र एअरलेट प्रशासनाने शिवसेनेला दिले आहे.