
आपल्या देशातील सर्वात महत्त्वाचे सर्च इंजिन म्हणून गूगलची ओळख ही सर्वज्ञात आहे. गूगल वापरून आपण आपल्याला हव्या त्या गोष्टींचा शोध घेऊ शकतो. नवीन माहिती मिळवू शकतो. परंतु याच गूगलवर महिला नेमकं काय पाहतात असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? तुमच्या याच प्रश्नाचं उत्तर गूगलने शोधायचा प्रयत्न केल्यावर त्यांना याच उत्तर अगदी अचूक सापडलं.
महिला या गूगलवर कायमच त्यांच्या आवडीचे विषय शोधण्यामध्ये व्यस्त असतात. यामध्ये रेसिपी, प्रेम, सौदर्य, आरोग्य, घरगुती उपाय, करिअर, मानसिक आरोग्य हे विषय सर्वाधिक सर्च केले जातात.
केस विरळ असतील तर त्यावर उपाय? यासारखे विषय महिला गूगलवर सर्वाधिक सर्च करताना दिसतात. महिला आणि सौंदर्य हे समीकरण खूप घट्ट आहे. त्यामुळे सौंदर्यासंदर्भातील लिखाण शोधण्यासाठी महिला गूगलचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात. तसेच करिअर या विषयालाही महिलांकडून मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाल्याचे निदर्शनास आलेले आहे.
मेकअप हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. या जिव्हाळ्याच्या विषयाला महिला अधिक वेळ देताना दिसतात. त्याचजोडीला रेसिपी हा विषय सर्व वयोगटातील महिला मोठ्या प्रमाणावर सर्च करताना आढळल्या आहेत.
गर्भधारणा, मासिक पाळी हे विषय महिलांच्या शोध कार्यात प्राधान्याने येतात. तसेच बाळ झाल्यानंतर कशी काळजी घ्यायला हवी हे विषय महिला चवीने वाचतात.
एकूणच महिलांची ही आवड-निवड लक्षात घेता, प्रत्येक महिलेचा आवडीचा विषय वेगळा हे लक्षात येतं. परंतु महिला या सर्वात जास्त प्रमाणात इंटरनेट वरील माहितीचा आस्वाद घेतात हेही तितकेच महत्त्वाचे आहे.