IPL 2025 – जसप्रीत बुमराह खेळणार की स्पर्धेला मुकणार, कोच महेला जयवर्धने यांनी दिली मोठी अपडेट

 

टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानंतर आता क्रीडाप्रेमींना जगातील सर्वात मोठी लीग आयपीएलचे वेध लागले आहेत. 22 मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणारअसून पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 23 मार्चला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे. या लढती पूर्वी मुंबई इंडियन्स संघाला दोन मोठे धक्के बसले. कर्णधार हार्दिक पंड्या पहिल्या सामन्याला मुकणार असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या खेळण्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे. याच संदर्भात मुंबईचा मुख्य प्रशिक्षण महिला जयवर्धने यांनी मोठी अपडेट दिली आहे.

जसप्रीत बुमराह गेल्या काही महिन्यांपासून हिंदुस्तानच्या संघातून बाहेर आहे. त्याच्यावर मध्यंतरी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून तो सावरत असून नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीला तो मुकला होता. त्यामुळे तो आयपीएलसाठी तरी उपलब्ध असणार की नाही याबाबत शंका होती. आता याबाबत महिला जयवर्धनेने माहिती दिली आहे.

बुमराह सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असून प्रत्येक दिवशी आम्ही त्याच्यावर लक्ष ठेऊन आहोत. त्याच्याशिवाय मैदानात उतरणे हे आव्हानात्मक असणारा आहे. मात्र त्याच्या अनुपस्थितीमध्ये इतरांना संधी मिळणार असून गेल्या दहा दिवसांपासून संघाची तयारी जोमाने सुरू आहे, असे महिला जयवर्धने म्हणाले.

संघातील वातावरण चांगले असून आमचे मुख्य खेळाडू कायम आहेत. पण आयपीएल जिंकणे सोपे नाही. प्रत्येक हंगामात नवीन आव्हान तुमच्यासमोर असते. मात्र मुंबई इंडियन्सच्या ताफ्यातील सात खेळाडूंना ही स्पर्धा जिंकण्याचा अनुभव आहे, असेही ते म्हणाले.

गेल्या काही हंगामामध्ये मुंबई इंडियन्स संघाची कामगिरी लौकिकास साजेशी झालेली नाही. याबाबत विचारले असता ते म्हणाले, गेल्या हंगामात आम्हाला बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. अर्थात त्यानंतर झालेल्या लिलावात बरेच नवीन खेळाडू संघात आले असून मुख्य खेळाडूही कायम आहे. आता या जुन्या आणि नव्या खेळाडूंची सांगड घालत यश मिळवण्याचे ध्येय आमच्या समोर आहे, असेही महेला जयवर्धने म्हणाले. तसेच कोणत्या 11 खेळाडूंना मैदानात उतरवायचे अद्याप निश्चित नाही, आम्ही खेळपट्टी पाहून निर्णय घेऊ असेही ते म्हणाले.