Vitamin B-12- व्हिटॅमिन B-12 म्हणजे काय आणि ते आरोग्यासाठी इतके महत्वाचे का आहे?

व्हिटॅमिन B-12, शरीराच्या न्यूरोलॉजिकल फंक्शनसाठी, लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी आणि डीएनएसाठी आवश्यक असलेले एक आवश्यक पोषक तत्व आहे. विशेषतः शाकाहारी लोकांमध्ये व्हिटॅमिन B-12 खूप कमी प्रमाणात आढळते. व्हिटॅमिन B-12 चे मुख्य स्रोत मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थ आहेत. ही जीवनसत्व पुरेशा प्रमाणात आपल्याला उपलब्ध नसतील तर, शरीरात अशक्तपणा, थकवा, हातपायांना मुंग्या येणे, चिंता आणि कमकुवत स्मरणशक्ती यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आपल्याला अनेकदा थकवा येतो, चक्कर येते किंवा स्मरणशक्ती कमी का होते? हे व्हिटॅमिन B-12 च्या कमतरतेमुळे होत असते. व्हिटॅमिन B- 12 का महत्वाचे आहे आणि ते तुमच्या आहारात कसे समाविष्ट करावे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

 

व्हिटॅमिन B-12 म्हणजे काय?
व्हिटॅमिन B-12 हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे, म्हणजेच ते पाण्यात विरघळून शरीरासाठी कार्य करत असते. मेंदू, मज्जासंस्था आणि रक्तपेशींच्या योग्य कार्यासाठी व्हिटॅमिन बी-१२ खूप गरजेचे आहे. शरीर ते स्वतः तयार करू शकत नाही, म्हणून ते अन्न किंवा पूरक पदार्थांमधून मिळवावे लागते.

 

शरीरासाठी व्हिटॅमिन B-12 का महत्त्वाचे आहे?

व्हिटॅमिन B-12 हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे मेंदू, मज्जासंस्था आणि रक्तपेशींच्या योग्य कार्यासाठी आवश्यक आहे. शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती, डीएनएची निर्मिती आणि शरीरासाठी ऊर्जा निर्मितीमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावते.

 

मेंदू आणि मज्जासंस्था मजबूत करते.

 

शरीरात ऊर्जा टिकवून ठेवते आणि थकव्याची लक्षणे दूर करते.

 

अशक्तपणा रोखण्यास मदत करते.

 

स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्य सुधारते.

 

गर्भवती महिलांसाठी फायदेशीर.

 

व्हिटॅमिन B-12  च्या कमतरतेची लक्षणे?

सतत थकवा आणि अशक्तपणा

 

हात आणि पायांना मुंग्या येणे किंवा सुन्नपणा येणे

 

स्मरणशक्ती कमी होणे आणि लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे

 

मूड स्विंग्स, चिंता आणि चिडचिड

 

भूक न लागणे आणि वजन कमी होणे

 

त्वचा आणि डोळे पिवळे होणे

 

 

तुम्ही शाकाहारी असाल तर व्हिटॅमिन बी १२ ची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही गोष्टींचा समावेश करू शकता.

दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही, चीज आणि ताक

फोर्टिफाइड अन्न: बी१२ समृद्ध तृणधान्ये, सोया दूध

मांसाहारी पदार्थ: अंडी, मासे, चिकन

पूरक आहार: जर तुम्हाला आहारातून पुरेसे व्हिटॅमिन बी१२ मिळत नसेल, तर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने बी१२ पूरक आहार घेऊ शकता. व्हिटॅमिन बी १२ आपल्या शरीरासाठी ऑक्सिजनइतकेच महत्त्वाचे आहे. त्याच्या कमतरतेकडे दुर्लक्ष केल्यास गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला वारंवार अशक्तपणा, चक्कर येणे किंवा स्मरणशक्तीच्या समस्या जाणवत असतील तर रक्त तपासणी करून ते तपासा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)