
कौटुंबिक वादातून माथेफिरू पतीने पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याने तिचे शिर झाडाझुडपात तर धड नाल्यात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर वसई-विरार हादरले आहे. उत्पला हिप्परगी असे मृत पत्नीचे नाव असून तिचा पती हरीश याने ८ जानेवारी रोजी तिची हत्या केली होती.
१४ मार्च रोजी विरारफाटा येथील पिरकुंडा दर्गाजवळील झुडपात फेकलेल्या सुटकेसमध्ये एका महिलेचे शिर आढळून आल्याची माहिती मांडवी पोलिसांना मिळाली होती. याप्रकरणी गुन्हे शाखा ३ च्या पथकाने समांतर तपास करत एका सराफाच्या बटव्याच्या आधारे हत्येचा उलगडा केला होता. पोलिसांनी पती हरीशला बेड्या ठोकत पोलिसी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.