
तब्बल 21 महिन्यांपासून रस्ते रक्तपाताने माखल्यानंतर आणि अडीचशे निष्पापांचा बळी गेल्यानंतर अखेर भाजप जागा झाला. मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता मलमपट्टी म्हणून मणिपूरच्या बजेटला संसदेच्या दोन्ही सभागृहांत मंजुरी देण्यात आली असून 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 51 हजार 463 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.