क्षयरोग रुग्णालयास सोयीसुविधा देणार

शिवडी येथील क्षयरोग रुग्णालय हे राज्यातील सर्वात मोठे क्षयरोग रुग्णालय आहे. या रुग्णालयास आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा पुरवण्यात येतील अशी माहिती नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत दिली. शिवडी येथील क्षयरोग रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही क@मेरे, रक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. या रुग्णालयात रुग्णसेवा देण्यासाठी विशेषज्ञ वैद्यकीय सल्लागार, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व शल्यचिकित्सक संवर्गातील 20 पदे कार्यरत आहेत. 33 पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात आली असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली. यासंदर्भात श्रीकांत भारतीय यांनी प्रश्न उपस्थित केला होता.