
राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांनी आज विधानसभेत केली. महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या वारसाचे जतन व संवर्धन करणे हे राज्य शासनाचे आद्य कर्तव्य आहे. राज्य सांस्कृतिक केंद्रामध्ये भव्य ऑडिटोरियम, कलादालने व रिसर्च सेंटर आदी बाबी नियोजित आहेत असे आशीष शेलार यांनी सांगितले.