50 हजार कर्मचारी कपात; बंगळुरूमध्ये आयटी सेक्टर ठरतंय धोक्याचं!

बंगळुरू शहर हे आयटी सेक्टरसाठी खास समजले जाते, परंतु हेच सेक्टर धोक्याचे ठरत आहे. 2024 मध्ये आयटी सेक्टरमधील 50 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले आहे, तर येणाऱ्या काळात आणखी कर्मचारी कपात होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

बंगळुरूमध्ये कर्मचारी कपातीचा परिणाम हाऊसिंग मार्पेट, रियल इस्टेट आणि स्थानिक व्यवसायांवरसुद्धा पडत आहे. बंगळुरूमध्ये मोठय़ा प्रमाणात पेइंग गेस्ट, निवास आणि भाडय़ाने कर्मचारी राहतात, परंतु हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गंडातर आल्याने ते बंगळुरू सोडून अन्य शहरांत जात आहेत. एआय आणि ऑटोमेशनमुळे अनेक एन्ट्री लेवल प्रोग्रामर्स व सॉफ्टवेयर टेस्टर्सच्या नोकऱ्या जात आहेत. आता पंपन्या कोडिंग, डिबगिंग आणि सॉफ्टवेयर ऑप्टिमायझेशनसाठी एआय सिस्टमचा वापर करत आहेत. बंगळुरूमधील रिंग रोड परिसरात टेक पार्क आणि कॉर्पोरेट कार्यालये मोठय़ा प्रमाणात आहेत.