Palm Rubbing- दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर घासल्याने, आरोग्यासाठी मिळतील खूप सारे फायदे

सकाळी उठल्यावर अनेकजण सर्वात आधी अंथरुणात हाताचे पंजे एकमेकांना घासतात. त्यानंतर लगेच आपले हात चेहऱ्यावरुन फिरवतात. हे असं नेमकं का करतात यामागेही महत्त्वाचं शास्त्रीय कारण आहे. दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर घासल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि आपण ताजेतवाने होतो. हातांच्या पंजांवर शरीरातील खूप महत्त्वाचे बिंदू असतात. त्यामुळेच रक्ताभिसरण होण्यासाठी यावर घर्षण होणे गरजेचे असते. मुख्य म्हणजे कुणीही बेशुद्ध पडल्यावर, सर्वात आधी हातांचे पंजे चोळण्याचा प्रयत्न केला जातो. हाताचे पंजे चोळल्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढण्यास मदत होते.

हातांचे पंजे एकमेकांवर घासण्याचे फायदे

दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर घासल्याने रक्ताभिसरण जलद होते. एखादी व्यक्ती बेशुद्ध पडते तेव्हा त्याचे पंजे घासले जातात. आरोग्याच्या दृष्टीने ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

 

दोन्ही हातांचे पंजे एकमेकांवर घासल्यामुळे शरीर ताजेतवाने होते तसेच अंगात एक अनोखी ऊर्जा संचारते.

 

केवळ इतकेच नाही तर, दोन्ही हाताचे पंजे एकमेकांवर चोळल्याने आपल्या डोळ्यांनाही खूप फायदा होतो. जेव्हा तुम्ही तुमचे पंजे घासता तेव्हा ते गरम होतात. त्याची उष्णता डोळ्यांचा ताण कमी करते आणि डोळ्यांभोवती रक्त परिसंचरण वाढवते. यामुळे थकलेल्या डोळ्यांनाही आराम मिळतो. असे केल्याने आपली दृष्टीदेखील चांगली राहते.

 

आपल्या मानसिक आरोग्यासाठी हाताचे पंजे एकमेकांवर घासण्याचे खूप फायदे आहेत. हाताचे पंजे घासल्यामुळे आपले मन शांत होण्यास मदत होते. तसेच दिवसभराचा थकवा देखील दूर होतो आणि ताजेतवाने वाटायलाही मदत होते.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)