
संसदेच्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी मुंबई आणि कोकण रेल्वे प्रवाशांच्या सुविधांबाबतची मागणी केली आहे. रेल्वे स्थानकांचा विकास आणि सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. ही चांगली बाब आहे. मात्र, त्यासोबतच प्रवाशांना स्थानकात मुलभूत सुविधाही पुरवण्याची गरज असल्याचे सावंत यांनी सांगितले.
सध्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करताना सौंदर्यावर अधिक भर दिला जातो. मात्र प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर स्वच्छता, शौचालये अन्य मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे. कोकण रेल्वेवर डबल ट्रॅक झाल्यास वाहतूक सुलभ होईल. तसेच, दादर-सावंतवाडी ही रेल्वे कोरोना काळात बंद करण्यात आली होती. ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. गोरखपूर रेल्वे सुरू करण्यात आली, मग दादर-सावंतवाडी ट्रेन नियमित सुरू करण्यासाठी इतका वेळ का लागतोय? ही सेवा लवकरात लवकर पुनः सुरू करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
सध्या रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करताना सौंदर्यावर अधिक भर दिला जातो, मात्र प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर स्वच्छता,
शौचालये अन्य मूलभूत सुविधा देण्याची गरज आहे. कोकण रेल्वेवर डबल ट्रॅक झाल्यास वाहतूक सुलभ होईल. तसेच,… pic.twitter.com/Lla6Icc97j— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) March 18, 2025
छत्रपती शिवाजी महाराज स्थानकात छत्रपती शिवाजी महराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी अनेकदा होत आहे. त्यामुळे या मागणीकडे लक्ष देण्यात यावे. तसेच स्थानकांची नावे बदलण्यात येत आहेत. मुंबईच्या जडणघडणीत महत्त्वाचे योगदान असलेल्या दादा शंकरशेट यांचे नाव मुंबई सेंट्रल स्थानकाला देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. मुंबई लोकल ट्रेनमध्ये महिलांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. डहाणूपर्यंतचा टप्पा लोकलने गाठला आहे. त्यामुळे या गाड्यांच्या महिला डब्यांमध्ये शौचालयाची व्यवस्था करण्यात यावी. तसेच रेल्वे स्थानकातही मूलभूत सुविधांकडे लक्ष देण्यात यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली.