मुस्लिमांवर आर्थिक बहिष्कार टाका! आरएसएसच्या व्हायरल व्हिडीओने खळबळ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोंबिवलीत आरएसएसच्या शाखेवर दगडफेक झाल्यानंतर आरएसएसकडून वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लिम दुकानदारांकडून कोणतेही साहित्य खरेदी करू नका, पाच-सहा किलोमीटर चालावे लागले तरी चालेल, पण मुस्लिम रिक्षाचालकांच्या रिक्षात बसू नका, असे विधान करण्यात आले आहे. सदर व्हिडीओ हा आप्पा दातार चौकात झालेल्या सभेतील आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

डोंबिवलीतील खंबाळपाडा परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीत वातावरण तणावपूर्ण झाले. डोंबिवलीतील टिळकनगर पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला. तपासानंतर एका तरुणासह चार अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर दोन दिवसांपूर्वी आरएसएसच्या कार्यकर्त्यांची आप्पा दातार चौकात झालेल्या सभेत मुस्लिमांवर बहिष्कार टाकण्याचे वादग्रस्त वक्तव्य करण्यात आले आहे.