
महिलेचे न्यूड फोटो तयार करून इन्स्टाग्रामवर व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्याला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने महिलेच्या नावाने आयडी तयार करून दोन हजारांची मागणी केली होती.
रघुवर चौधरी (वय 19, रा. हडपसर, मूळ बिहार) असे आरोपीचे नाव आहे. वानवडी पोलीस ठाण्यातील सायबर पथकातील हवालदार अमोल पिलाणे आणि अतुल गायकवाड यांनी सोशल मीडियावरून माहिती प्राप्त केली. चौधरीने फेक आयडी तयार केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने त्याच्या मोबाईलची तपासणी केली. त्यावेळी त्याने गुन्हा केल्याचे उघड झाले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आदमाणे, निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक आशीष जाधव, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, सोमनाथ कांबळे सुजाता फुलसुंदर यांनी केली.