फेब्रुवारीत घाऊक महागाई 2 टक्क्यांनी वाढली

5 ट्रिलीयन इकॉनॉमीचे स्वप्न दाखवणाऱया मोदी सरकारच्या काळात दिवसेंदिवस महागाई वाढत चालल्याचे दिसत आहे. भाज्या, इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि शीतपेये या उत्पादनांच्या किमती वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात घाऊक महागाईत तब्बल 2.38 टक्क्यांची वाढ झाल्याचे समोर आले आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जारी केलेल्या अहवालातून महागाई वाढल्याचे उघड झाले आहे.

महागाईवर आधारित घाऊक किंमत निर्देशांक जानेवारी महिन्यात 2.31 टक्के इतका होता. फेब्रुवारी 2025 मध्ये अन्न उत्पादनांचा उत्पादन खर्च वाढल्याने महागाई वाढल्याचे समोर आले आहे.