
पंजाबच्या अमृतसरमध्ये पोलिसांनी दोन हवाला ऑपरेटर्सना अटक केली आहे. सुखजीत सिंग आणि रणबीर सिंग अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी 561 ग्रॅम हेरॉइनसह 17.6 लाखांची कॅश रोकड आणि 4 हजार अमेरिकन डॉलर्स जप्त करण्यात आले आहेत. सुखजीत सिंग आणि रणबीर सिंग हे ड्रग्ज तस्करांना केवळ आर्थिक मदत करत नव्हते तर हवालाद्वारे हे व्यवहार लपवण्याचा प्रयत्नदेखील करत होते.