
औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या राजकारणावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय जाधव यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकांच्या घरातील चुली पेटण्याऐवजी घरे पेटतील असं काम सरकारने करू नये, असा इशारा त्यांनी सरकारला दिला. ते माध्यमांशी बोलत होते.
हे वाचा – औरंगजेबाच्या कबरीबाबत फडणवीसांनी केलं वक्तव्य, दिली महत्त्वाची माहिती
औरंगजेबाची कबर तुम्हाला आजच दिसली का? अनेक वर्षापासून ती कबर असून कारवाईच करायची असेल तर कायद्याने करा. सभागृहामध्ये बील चर्चेला आणा, पास करा आणि निर्णय घ्या. पण सरकारला समाजामध्ये भांडण लावून स्वत:ची पोळी भाजायची का? लोकांना गुण्यागोविंदाने नांदू द्यायचे नाही का? आज देशातील आणि राज्यातील सत्ताही तुमच्याकडे आहे. मग एवढी भीती का वाटतेय? असा सवाल करत लोकांच्या घरातील चुली पेटण्याऐवजी घरे पेटतील असं काम सरकारने करू नये, असे संजय जाधव म्हणाले.
लोकांच्या घरातील चुली पेटण्याऐवजी घरे पेटतील असं काम सरकारने करू नये.
– संजय जाधव, खासदार@SanjayJadhavMP pic.twitter.com/oD2haYSWoI
— Shivsena UBT Communication (@ShivsenaUBTComm) March 17, 2025