
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरण धनंजय मुंडे यांचे जवळचे वाल्मीक कराड यांना अटक झाली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला होता. अखेर त्यांनी वैद्यकीय कारण सांगत राजीनामा दिला. आता आणखी एका मंत्र्याची विकेट आगामी चार-सहा महिन्यात जाणार असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळतील. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल, असा गौप्यस्फोट सुप्रिया सुळे यांनी केला. त्यामुळे हे मासे कोण याची चर्चा सुरू झाली आहे.
डरपोक मंत्री, बायकोच्या आडून बोलतात; सुप्रिया सुळे यांचा इशारा कुणाकडे?
वाचा सविस्तर – https://t.co/zx5ir8J10m pic.twitter.com/x0dEcHVnkW— Saamana Online (@SaamanaOnline) March 17, 2025
अजितदादा, मुंडेंवर निशाणा
मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्य काढेन, परंतु नैतिकता सोडणार नाही, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला.