
चहा किंवा कॉफी यापैकी निवड करायची झाल्यास, अनेकजण झटक्यात कॉफीची निवड करतात. कॉफीची खासियत म्हणजे आपली उर्जेची पातळी वाढवण्यासाठी कॉफी फार महत्त्वाची भूमिका बजावते. दिवसाची सुरुवात चांगली करण्यासाठी, डेटिंगसाठी तर कॉफी पिण्याकडेच अनेकांचा कल असतो. त्यामुळे कॉफी केवळ आवडच नाही तर इमोशन्स आहेत. कॉफी पिणं हा केवळ स्टेटस् सिम्बाॅल नाही तर, कॉफी पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत.
दररोज कॉफी पिण्याचे फायदे
कॉफीमुळे ऊर्जेची पातळी वाढते
कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे शरीरातील थकवा कमी होतो, म्हणूनच शरीरातील उर्जेची पातळी वाढवण्यासाठी कॉफी ओळखली जाते. कॅफिन एडेनोसिन नावाच्या न्यूरोट्रांसमीटरसाठी रिसेप्टर्सना वाढवते आणि यामुळे आपल्या मेंदूतील न्यूरोट्रांसमीटरची पातळी वाढते जे डोपामाइनसह आपल्या उर्जेची पातळी नियंत्रित करतात.
टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो
नियमितपणे कॉफी पिल्याने दीर्घकालीन टाइप २ मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो. कॉफी अँटीऑक्सिडंट्समध्ये देखील समृद्ध आहे आणि ते इन्सुलिन संवेदनशीलता, जळजळ आणि पचन यावर परिणाम करू शकते.
मानसिक आरोग्यास उपयुक्त
नियमितपणे कॅफिनचे सेवन करतात त्यांना पार्किन्सन आजार होण्याचा धोका लक्षणीयरीत्या कमी होतो. याव्यतिरिक्त, कॅफिनचे सेवन कालांतराने पार्किन्सन रोग होण्याचा धोका कमी करू शकते. तुम्ही जितकी जास्त कॉफी प्याल तितका अल्झायमर रोगाचा धोका कमी होण्याची शक्यता वाढते.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
कॉफी पिऊन वजन कमी होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच वजन कमी करणारे कॉफी पिणे अधिक पसंत करतात. वजन नियंत्रित ठेवण्यासाठी कॉफी ही खूप फायदेशीर मानली जाते. जास्त कॉफी पिल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते, कारण कॉफी हे चरबी कमी करणारे पेय आहे.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)