मिंधेंच्या वामन म्हात्रेच्या बॉडीगार्डचा प्रताप; सहकाऱ्याची बंदूक चोरली

मिंधे गटाचे वादग्रस्त पदाधिकारी वामन म्हात्रे हे आपल्या बॉडीगार्डच्या कारनाम्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. म्हात्रे यांच्या बॉडीगार्डने आपल्या सहकारी बॉडीगार्डची बंदूक चोरली. याप्रकरणी बलापूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून बंदूक चोरणाऱ्या बॉडीगार्डच्या मुसक्या आवळल्या. सहकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी ही चोरी केली असल्याची कबुली आरोपींने दिली आहे.

जलाल पांडे आणि कृष्णा तिवारी हे दोघेही वामन म्हात्रे यांच्याकडे खासगी बॉडीगार्ड म्हणून काम करतात. त्यांच्याकडे परवाना असलेल्या बंदुका आहेत. कृष्णा तिवारी हा होळीच्या दिवशी वामन म्हात्रेच्या एरंजाड येथील फार्महाऊसवर आराम करत होता. यावेळी आठ काडतुसे आणि बंदूक त्याने उशीखाली ठेवली होती. काही वेळाने तो आंघोळीला गेला असता जलाल पांडे याने त्याच्या बंदूक आणि काडतुसांची चोरी केली. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.