
औरंगजेब हा क्रूर शासक होता, देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभारही एकसारखाच आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. रत्नागीरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत.
माध्यमांशी संवाद साधताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, “औरंगजेब हा क्रूर शासक होता. औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. तो नेहमी धर्माचा आधार घ्यायचा. तो क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत. तेही धमार्चा आधार घेत आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात आज देवेंद्र फडणवीस सरकार आहे. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीस यांचा कारभार एकसारखाच आहे.”