फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय बोला, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्यांना आदेश

सांगलीतून ज्याची सुरुवात होईल ती गुढी भविष्यात राज्यात उभारली जाईल, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी आता फोनवरुन हॅलोऐवजी जय शिवराय बोला, अशी सूचना केली. आता येथून पुढे पह्न लावल्यावर जय शिवराय बोलायचं, सुरुवात सांगलीतून होईल हा प्रांताध्यक्षांचा आदेश आहे, असे शिंदे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आज सांगलीत पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शशिकांत शिंदे म्हणाले, सांगली जिह्याचा बालेकिल्ला आपण शाबूत ठेवला. परंतु, दुर्दैवाने सातारामधील बालेकिल्ला मात्र नेस्तनाबूत झाला आहे. गावामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत लढले, त्यांनी हार मानली नाहीत. त्यांच्यासोबत जे शेवटपर्यंत लढले ते इतिहासामध्ये अजरामर झाले. तसेच, तुम्ही देखील पक्षासोबत शेवटपर्यंत लढा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना करतानाच येथून पुढे फोनवर बोलताना हॅलोऐवजी जय शिवराय बोला, अशी सूचना केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, रोहित पाटील उपस्थितीत होते.