
युट्यूब पाहून वजन कमी करणं एका तरुणीच्या जीवावर बेतले. वजन कमी करण्यासाठी तरुणीने फक्त पाण्यावर राहण्याचा निर्णय घेतला होता. पोटात अन्नाचा कण न गेल्यामुळे या तरुणीचा मृत्यू झाला.
केरळच्या थलासेरी शहरात हा धक्कादायक प्रकार घडला. संबंधित मुलीला वजन कमी करायचे होते. त्यासाठी तिने युटय़ूबवरील व्हिडिओची मदत घेतली. सहा महिने ती तरुणी फक्त गरम पाणीच पित होती. त्या सहा महिन्यात जवळपास 24 किलो वजन कमी केले. पण तेच तिच्या जिवावर उलटले. अतिवजन घटवल्याने तिची प्रकृती खालावली त्यात तिचा मृत्यू झाला. तरुणीला एनोरेक्सिया नावाचा एक आजार जडल्याची माहिती मिळाली.
एनोरेक्सियाची लक्षणं काय
- व्यक्तीला वजन वाढल्यासारखं वाटतं.
- माणसं खाण्यापिण्याच्या सवयींबाबत चिंतीत होतात.
- पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एनोरेक्सियाचं प्रमाण अधिक.
- 13 ते 30 वयोगटातील मुली-महिलांमध्ये आजार आढळतो.