
अर्धापूर नांदेड रस्त्यावरील पिंपळगाव पाटीजवळ झालेल्या स्कॉर्पिओ-ट्रकच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. हा आपघात शनिवारी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास झाला. अपघातातील जखमींवर नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या अपघातामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळित झाली होती. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.अर्धापूर पोलीसांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली व जमावाला पांगवले.
र्धापूरकडुन स्कॉर्पिओ नांदेडकडे जात असताना ही जीप पिंपळगाव महादेव पाटीजवळ आली आसता जीप चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दुभाजक ओलांडून नांदेडकडून येणाऱ्या ट्रकवरकार धडकली. या अपघातात सय्यद हुसेब (वय 32,रा. पाकाजीनगर नांदेड),शेख सलाम वय (वय 30, रा पाकीजानगर नांदेड) ,शेख मस्तान शेख मैनुद्दीन (वय 30, रा शाहीननगर नांदेड), सय्यद रियाज सय्यद गौस (वय 28 रा. पाकीजानगर नांदेड), सय्यद फजल सय्यद गौस (वय 27, पाकीजा नगर नांदेड),नमौद्दीन हबीब खान (वय 28, पाकीजानगर नांदेड) शेख रिजवान आलीम (वय 25, रा. पाकीजानगर नांदेड), शंकर बोडखे (रा. पिंपळगाव ता. अर्धापूर) हे जखमी झाले.
त्यांना तातडीने उपचारासाठी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपासणी करून सय्यद हुशेब व शेख सलाम यांना मृत घोषित केले.