पॉपकॉर्ननंतर आता डोनट्सवर GST; जयराम रमेश यांचा मोदी सरकारवर निशाणा

काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारच्या जीएसटी धोरणावर हल्लाबोल केला आहे. सिंगापूर डोनट्स साखळीवर 100 कोटी रुपयांच्या कर नोटीसनंतर, काँग्रेसने याला जीएसटीआयटीसचे आणखी एक उदाहरण म्हटले आहे. काँग्रेसने यापूर्वी पॉपकॉर्नवरील वेगवेगळ्या जीएसटी दरांवरून सरकारवर टीका केली होती. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी मोदी सरकारच्या जीएसटी धोरणावर टीका केली आहे.

रमेश यांनी एका मीडिया रिपोर्टचा हवाला देत लिहिले की, पॉपकॉर्ननंतर आता डोनट्सवरही जीएसटीचा परिणाम होत आहे. मॅड ओव्हर डोनट्सला 100 कोटी रुपयांच्या कर नोटीसचा सामना करावा लागत आहे, डोनट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या या ब्रँडवर त्यांच्या व्यवसायाचे चुकीचे वर्गीकरण केल्याचा आणि डोनट्सवर 5% जीएसटी (रेस्टॉरंट सेवा म्हणून संबोधून) भरल्याचा आरोप आहे. बेकरी उत्पादनांवर 18% कर आकारला जातो. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचले आहे. याबाबत जयराम रमेश यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये, काँग्रेसने म्हटले होते की जीएसटी अंतर्गत पॉपकॉर्नसाठी तीन वेगवेगळ्या कर स्लॅबची हास्यास्पद व्यवस्था केवळ प्रणालीची वाढती गुंतागुंत अधोरेखित करते. मोदी सरकार जीएसटी 2.0 लागू करण्यासाठी संपूर्ण फेरबदल करण्याचे धाडस दाखवेल का असा प्रश्न विचारला होता.पॉपकॉर्न नंतर, आता डोनट्सना जीएसटीआयटीसचा त्रास होण्याची पाळी आहे. मॅड ओव्हर डोनट्सला त्यांच्या व्यवसायाचे चुकीचे वर्गीकरण केल्याबद्दल आणि बेकरी आयटमवर 18% ऐवजी त्यांच्या डोनट्सवर 5% कर भरल्याबद्दल (ते रेस्टॉरंट सेवा असल्याचा दावा करत) 100 कोटी रुपयांच्या कर नोटीसचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण आता मुंबई उच्च न्यायालयात आहे, असे रमेश यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.