
>> तेजस पोळ
आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगात राहत आहोत. धाप लागेल इतक्या वेगाने विदा (डेटा) आणि माहिती निर्माण होत आहे आणि त्यावर प्रािढया केली जाऊन निर्णय घेतले जात आहेत. कॉम्प्युटरची शक्ती वाढत आहे. दैनंदिन आयुष्यात या गोष्टींबाबत मतं नसलेला सर्वसामान्य माणूसदेखील केवळ सोयींसाठी किंवा मनोरंजनासाठी असलेली विविध अॅप्स आणि वेबसाइट्स वापरताना या युगातील एक प्यादे किंवा एजंट ठरत आहे. अशा वेळी अधिकाधिक वेगाने अवतरत असलेल्या एआयकडे आणि मानवाच्या भविष्याकडे पाहण्याची दृष्टी देणारं महत्त्वाचं पुस्तक म्हणजे युवाल नोआ हरारी यांचं `नेक्सस’, ज्याचा प्रणव सखदेव यांनी केलेला मराठी अनुवाद मधुश्री पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाला आहे.
जगातील सर्वात प्रभावशाली बुद्धिवंतांपैकी एक गणले गेलेले हरारी मानवजातीच्या इतिहासात माहिती हीच खरी नायिका असल्याचं प्रतिपादन करतात. माहिती म्हणजे काय? माहिती, सत्य, शहाणपण आणि सत्ता यांच्यात काय आंतरसंबंध आहेत? कृत्रिम बुद्धिमत्ता (artificial intelligence) अर्थात एआय या आंतरसंबंधांवर आधारून काम करताना कोणते धोके वा संधी निर्माण करत आहे? या व अशा अनेक प्रश्नांचा ऊहापोह `नेक्सस’ या पुस्तकात केला आहे. विस्तृत इतिहासातील घटनांना, कार्यकारण भावाला तसेच भव्यदिव्य ट्रेंड्सना आणि प्रसंगांना एकत्र करून आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याची डॉ. हरारी यांची हातोटी विख्यात आहे. ती या पुस्तकातही पदोपदी जाणवते.
पुस्तकाच्या मलपृष्ठावर या पुस्तकाला “थरारक आणि रक्त गोठवणारे” असं म्हटलं आहे. कथा, कल्पना, पुस्तकं आणि इंटरनेटच्या आधारे विस्तृत पातळीवर काम करणारी मानवी जाळी (हैदक्s) निर्माण झाली. कॉम्प्युटर आणि अल्गोरिदम माणसांना एकमेकांविरुद्ध उभे करत असताना “कृत्रिम बुद्धिमत्ता काय करेल?” हाच तो थरारक आणि रक्त गोठवणारा प्रश्न! याचा विचार करताना `2001 स्पेस ओडिसी’ या चित्रपटाची आठवण येते. परग्रहावरील जीवसृष्टी शोधायची मोहीम ज्याला हाती दिली असा कॉम्प्युटर, हा शोध थांबवून सुरक्षित घरी जाऊ इच्छिणाऱया अंतराळवीरांना खुशाल समाधी देतो! तशीच काहीशी स्थिती आज किंवा भविष्यात घडणार नाही ना?
वरवर पाहता गेम्स वाटणारी, परंतु पडद्यामागे डेटा आणि एआयचा वापर करून कदाचित भयंकर व मोठा छुपा कार्पाम (hiddend agenda) असणारी अॅप्स लोक सर्रास वापरत आहेत. अशा परिस्थितीत डेटा आणि एआयशी संबंधित धोके यांचे ज्ञान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं नितांत गरजेचं आहे. त्यामुळे हे `नेक्सस’चं हे भाषांतर एक महत्त्वाचं पाऊल आहे.
भाषांतरित पुस्तकात मूळ विषयाचा आशय आला आहेच, पण त्याचबरोबर क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या संकल्पना मांडताना सखदेव यांनी सुगम शब्द वापरून त्याला वाचकापर्यंत पोहोचवलं आहे. उदाहरणार्थ, पैसा किंवा धर्म इत्यादी संकल्पना कथा किंवा भ्रम पातळीवर काम करून मानवाला एकत्र आणतात. अशा संकल्पनांना भ्रमोत्पादक असा शब्द त्यांनी वापरला आहे. भ्रम असूनदेखील त्यांना भ्रामक न म्हणता भ्रमोत्पादक असं म्हणण्याने विषयाचं गांभीर्य दर्शविलं जातं. भाषांतरित संज्ञा वापरताना मूळ इंग्रजी संज्ञासुद्धा दिल्या असत्या तर आणखी फायदा झाला असता असं जाता जाता सुचवावंसं वाटतं.
`नेक्सस’ एआयआधारित सोशल ाsढडिट सिस्टम किंवा तत्सम एकात्मिक (ग्हा्) प्रणाली कशी असेल, त्यातले धोके याबद्दल भाष्य करते. दूरगामी, सर्वंकष, गुंतागुंतीचा आणि आपल्या जगण्यावर थेट परिणाम करणारा विषय समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजेच.
नेक्सस
अनुवाद : युवाल नोआ हरारी
अनुवाद : प्रणव सखदेव
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन्स
पृष्ठे : 464 किंमत : रु.500