
अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि तिचा सहकारी बुच विल्मोर सुमारे 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकले आहेत. आता ते स्पेसएक्स बचाव मोहिमेद्वारे लवकरच पृथ्वीवर परतणार आहेत. ते पृथ्वीवर परतण्यापूर्वी तज्ज्ञांनी या अंतराळवीरांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. या अंतराळवीरांना पृथ्वीवर परतल्यानंतर प्रकृतीच्या अनेक समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना पृथ्वीवर परतल्यावर चालणेही कठीण होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर सुमारे 9 महिन्यांपासून अवकाशात अडकले आहेत. ते पुढच्या आठवड्यात पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे. ते पृथ्वीवर परतल्यानंतर जमिनीवर पाऊल ठेवताच त्यांना चालण्यासाठी अडचण येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे चालयचे कसे हे ते विसरले असतील, असे तज्ज्ञांनी सांगितले. तसेच यामागील कारणही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात आहेत. पुढच्या आठवड्यात जेव्हा हे दोन्ही अंतराळवीर पृथ्वीवर परततील तेव्हा त्यांना चालता येणार नाही. ते नऊ महिने अंतराळात असल्याने ते चालणे विसरले असण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. ते पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या पायाची क्रिया लहान मुलांच्या पायाप्रमाणे असेल. त्यामुळे त्यांना पुन्हा चालण्यास सुरुवात करावी लागेल. सुरवातील एक-एक पाय उचलणेही त्यांच्यासाठी वेदनादायी ठरू शकते, असेही तज्ज्ञांनी सांगितले.
डेली स्टारने याबाबतते वृत्त दिले आहे. नासाचे माजी अंतराळवीर लेरॉय चिआओ यांनी सांगितले की, त्यांच्या पायाखालील कठीण ऊती कमी झाल्या असतील. त्यामुळे चालण्याची क्रिया वेदना देणारी ठरू शकते. लेरॉय यांनी सांगितले की, जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ अतंराळात असेत , तेव्हा तेव्हा त्यांच्या पायांवरील त्वचेचा एक जाड थर निघून जातो. तसेच अंतराळ गुरुत्वाकर्षण नसल्याने ते चालणे विसरुन जातात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पृथ्वीवर परतल्यावर त्यांच्या पायातील लवचिकता कमी झालेली असते आणि अस्थींमध्ये कणखरपणा आला असतो. त्यामुळे त्यांना सुरुवातीचे काही दिवस चालणे कठीण होते. आरोग्यतज्ज्ञ सुनीता आणि बुच यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत. दीर्घकाळ अंतराळात घालवल्याने त्यांचे अस्थी आणि उतींचे किती नुकसान झाले आहे, याचे निदान करून त्यांना पुढील उपचारपद्धती ठरवावी लागणार आहे.