साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 16 मार्च 2025 ते शनिवार 22 मार्च 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – चौफेर सावध रहा

मेषेच्या धनेषात हर्षल राश्यांतर, चंद्र गुरू प्रतियुती. क्षेत्र कोणतेही असो चौफेर सावध रहा. भावनेच्या आहारी न जाता योग्य निर्णय घ्या. नोकरीत काम वाढेल. स्पर्धा करणारेही वाढतील. मित्र दुरावा दाखवतील. धंद्यात हिशेब पुन्हा तपासा. नवीन परिचयावर विश्वास ठेवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात दगदग, मनस्ताप होईल.
शुभ दि. 17, 18

वृषभ – रागावर ताबा ठेवा

स्वराशीत हर्षल राश्यांतर, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. कठीण प्रसंगावर मात करून यश मिळवावे लागेल. अचानक खर्च निर्माण होईल. नोकरीत प्रभाव दाखवण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल. रागावर ताबा ठेवा. धंद्यात लाभ, प्रगती होईल. वाद करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे मांडताना कसरत करावी लगोल.
शुभ दि. 16, 20

मिथुन -मनाप्रमाणे यश लाभेल

वृषभ राशीत हर्षल राश्यांतर, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. प्रवासात घाई नको. अनेक कामांना गती देता येईल. खर्चावर ताबा ठेवणे कठीण होईल. रागाचा पारा वाढू देऊ नका. मनाप्रमाणे यश खेचता येईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राखाल. धंद्यात आळस नको. लाभ वाढेल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अनेक दिग्गजांचे परिचय होतील.
शुभ दि. 16, 17

कर्क – लोकप्रियता वाढेल

वृषभ राशीत हर्षल राश्यांतर, सूर्य नेपच्यून गती. महत्त्वाच्या कामांना प्राधान्य द्या. सप्ताहाच्या शेवटी रागावर ताबा ठेवा. प्रवासात काळजी घ्या. नोकरीत प्रभाव वाढेल. व्यवसायात लाभ होईल. गुंतवणूक करता येईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात लोकप्रियता वाढेल. नवीन ओळखी होतील. कायद्याचा प्रश्न निकालात काढता येईल.
शुभ दि. 16, 17

सिंह – व्यवहारात फसू नका

वृषभ राशीत हर्षल राश्यांतर, रवि शुक्र युती. तुमचा आत्मविश्वास, उत्साह वाढेल परंतु कोणावरही विश्वास ठेवताना सावध रहा. व्यवहारात फसू नका. गोड बोलणे ओळखा. प्रकृतीची काळजी घ्या. मित्र, सहकारी, नातलग यांच्यात गैरसमज निर्माण होतील. धंद्यात उतावळेपणा नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा जपा.
शुभ दि. 16, 17

कन्या – नोकरीत वर्चस्व वाढेल

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य शुक्र युती. अडचणीत आलेली कामे, व्यवहार यावर लक्ष केंद्रित करा. यश मिळवा. नवीन परिचय प्रेरणादायक ठरतील. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. नोकरीत वर्चस्व वाढेल. धंद्यात फायदा होईल. सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे प्रभावी ठरतील. अनेक सहकारी तुमच्याकडे येतील.
शुभ दि. 17, 18

तूळ – गैरसमज होतील

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य चंद्र षडाष्टक योग. क्षेत्र कोणतेही असो उतावळेपणा दूर ठेवा. कोणतीही चूक करू नका. नोकरी टिकवा. मोह, व्यसन नको. नवीन परिचय घातक, फसवा ठरू शकेल. कोणताही व्यवहार करू नका. व्यवसायात सावध भूमिका घ्या. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद जपा. तटस्थ भूमिका घ्या.
शुभ दि. 20, 21

वृश्चिक – अनेकांचे सहकार्य मिळेल

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य, शुक्र युती. कला, साहित्यात मन रमेल. लेखन होईल. नवीन ओळख उत्साहवर्धक ठरेल. नोकरीत बदल होतील. लाभ, सुधारणा होतील. व्यवसायाला कलाटणी मिळेल. कर्जाचे काम करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मोठी कामगिरी कराल. अनेकांचे सहकार्य मिळेल. अडचणीत आलेली कामे करा.
शुभ दि. 20, 21

धनु – वैर वाढवू नका

वृषभेत हर्षल, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. कोणत्याही ठिकाणी निर्णय घेताना, संवाद साधताना, व्सवहार करताना चौकस रहा. फसगत टाळा. नोकरी टिकवा. वैर वाढवू नका. धंद्यात हिशेब तपासा. गुंतवणुकीची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याला धरून बोला. गैरसमज टाळा. आरोपांना सौम्य भाषेत उत्तर द्या.
शुभ दि. 16, 17

मकर – चांगले बदल होतील

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य नेपच्यून युती. साडेसातीचे शेवटचे पर्व आहे. तुम्हाला प्रगतीची संधी मिळेल. उत्साह, आत्मविश्वास वाढेल. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत बदल, सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चांगले बदल होतील. ओळखी वाढतील. नावलौकिकात भर पडेल. प्रेमाला चालना मिळेल.
शुभ दि. 16, 20

कुंभ – तणाव कमी होईल

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य शुक्र युती. साडेसाती सुरू आहे. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. नवीन परिचय उत्साहवर्धक ठरतील. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात लाभ, वाढ होईल. वसुली करा. घरातील वातावरण आनंदी राहील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कार्याचे कौतुक होईल.
शुभ दि. 17, 18

मीन – कामे पूर्ण होतील

वृषभेत हर्षल राश्यांतर, सूर्य, नेपच्यून युती. साडेसाती सुरू आहे. अनेक रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वास वाढवणाऱया घटना घडतील. नोकरीत वर्चस्व वाढेल. बदल शक्य. धंद्यात सहकार्य लाभेल. सुधारणा होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याची दखल घेतली जाईल. वरिष्ठ पद, अधिकार दिले जातील.
शुभ दि. 16, 20